🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
PSI /STI/ASO पूर्व परीक्षेसाठी कोणती पुस्तके वाचायची ?
---------------------------------------------------------------------
१) इतिहास - जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांनी आत्तापर्यत इतिहास वाचलेला नाही त्यांनी सुरूवातीला फौजदारी यशोमार्ग मधून इतिहास वाचावा त्यामधील महाराष्ट्राचा इतिहास + आधुनिक भारताचा इतिहास वाचावा
- महाराष्ट्राचा इतिहास - गाठाळ
- आधुनिक भारताचा इतिहास - रंजन कोळंबे
२) भूगोल - महाराष्ट्राचा भूगोल सवदी तसेच महाराष्ट्र भूगोल सवदी अँटलास याचा ही वापर करावा
-सवदी सरांचे भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल अशी दोन पुस्तके आहेत जर तुमच्याकडे भारताचा भूगोल हे पुस्तक असेल तर त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल , भारताचा भूगोल वाचावा .तसे पाहायला गेले तर भारताच्या भूगोल वर १-२ प्रश्न येतात ते प्रश्न इयत्ता १० वी भारताचा भूगोल चे जुने पुस्तक वाचले तरी चालेल
टीप- स्वता ट्रिक्स बनवाव्यात उदा नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम , डोंगररांगा
३) अर्थशास्त्र - चा अभ्यास करताना प्रश्नपत्रिका समोर ठेवा त्यामध्ये प्रश्न कोणत्या chapter वर आले आहेत ते बघा कारण बरेच जण unnecessary असलेले chapter वाचत बसतात उदा .भांडवल बाजार यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जे chapter महत्त्वाचे आहेत त्यांना वेळ द्या उदा सार्वजनिक वित्त २०१९ ला एकाच chapter वर ७ प्रश्न
प्रश्नपत्रिका बघितल्यावर तुमच्या लक्षात येईलच
टीप- महत्त्वाच्या घटकाच्या नोट्स काढाव्यात
४) राज्यशात्र- रंजन कोळंबे वाचावे आयोगाने कशावर प्रश्न विचारलेत ते पाहावे विनाकारण सरसकट वाचू नये उदा .निवडणूक सुधारणा , CBI , केंद्रीय दक्षता आयोग ज्यावर गट ब ला प्रश्न विचारले जात नाहीत
पंचायतराज , सुची , राज्यविधानमंडळ हे हमखास वाचा प्रश्न असतातच
5) सामान्यविज्ञान - सचिन भस्के वाचा ते वाचताना सुध्दा प्रश्नपत्रिका बघूनच त्यातील महत्त्वाचे chapter वाचा उदा प्रकाश , ध्वनी या chapter वर प्रश्न असतोच
नोट्स काढण्याच्या भानगडीत पडू नका कारण पुस्तक नोट्स टाईपच आहे
६) चालूघडामोडी
परिक्रमा वाचून त्यातील महत्त्वाच्या चालूघडामोडी स्वताच्या वहीत लिहून काढा
अभिनव - simplified यापैकी कोणतेही एक year book वाचा
७) गणित बुध्दीमत्ता - राज्यसेवा CSAT, वनसेवा , गटब , गट क या परीक्षेमध्ये आलेले गणित व बुध्दीमत्तेचे प्रश्न सोडवून त्याची एक notebook तयार करा
एवढी पुस्तके व्यवस्थित वाचा विनाकारण बाजारात मिळणारी भरमसाठ पुस्तके घेऊन कोणते वाचावे आणि कोणते वाचू नये असा गोंधळ करून घेऊ नका एकच पुस्तक वाचा पण ते वारंवार वाचा यश हमखास मिळेलच...
गट ब पूर्व परीक्षा तिन्ही पदासाठी Qualify होण्यासाठी प्रत्येक विषयात कमीतकमी एवढे गुण पाहिजेतच
इतिहास - ०८/१५
भूगोल -१२/१५
राज्यशात्र -०८/१०
चालू घडामोडी - १०/१५
सामान्य विज्ञान -०७/१५
अर्थशास्त्र ८/१५
गणित व बुद्धिमत्ता -७/१५
६०/१००
योग्य पध्दतीने अभ्यास केल्यास एवढे मार्क्स हमखास मिळतात फक्त योग्य नियोजन योग्य वाचन आणि प्रामाणिकपणे अभ्यास महत्त्वाचा आहे
Join us (Telegram) 👇 https://telegram.me/mpscsmarteducation1
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
0 Comments